इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला, यामध्ये तीन जण जखमी झाले. पाकिस्तानच्या भूकंप निरीक्षण केंद्राने सांगितले, की भूकंपाचे केंद्र मुसा खेल जिल्ह्याजवळ २८ किलोमीटर खोलीवर होते. भूकंपात दोन घरे उद्ध्वस्त झाली, तर तीन घरांचे अंशतः नुकसान झाले. बचाव कर्मचार्यांचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे, की घर कोसळल्याने तीन जण जखमी झाले.प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (पीडीएमए) प्रवक्त्याने सांगितले, की, बाधित भागात मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पथके नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. भूकंपामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना तंबू वाटप करण्यात येते आहेत.
Fans
Followers