कर्नाटकात रेल्वे मार्गावर दरड कोसळली   

मंगळुर : कर्नाटकात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. शनिवारी पहाटे सकलेशपूर ते सुब्रमण्या रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. दरडीचे मोठे दगड मार्गावर पडले आहेत. ते काढण्याचे काम अवजड यंत्रसामग्रीने हाती घेण्यात आले आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एडाकुमारी आणि शिरीबागिलू स्थानका दरम्यानच्या रेल्वे मार्गावर दरड कोसळली.  टेकडीवरील दगडधोंडे माल वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या मार्गावर कोसळले. त्यामुळे अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. 
 
बंगळुरू ते कन्नूर एक्स्प्रेस कादरगरवल्ली स्थानकात पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी आली. दरड कोसळल्यामुळे तीचा पुढचा प्रवास रखडला. बंगळुरू ते मुरडेश्वर एक्स्प्रेसबाबतही असेच घडले. ती सकलेशपूर येथे पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचली. विजयपुरा ते मंगळुर सेंट्रल एक्स्प्रेस ६ वाजून २६ मिनिटांनी स्थानकात आली. तिचा पुढचा प्रवास थांबला.

Related Articles