E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
Samruddhi Dhayagude
02 Jul 2025
" id="MainContent_rptNews_ancWhatsApp_0" style=" background-color: #4c66a3" target="_blank" data-action="share/whatsapp/share">
" id="MainContent_rptNews_ancFacebook_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancTwitter_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancLinkedIN_0" target="_blank">
सूर्यकांत आसबे
सोलापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने इंदापूर तालुक्यातील सराटी येथून मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले.
चला पंढरीसी जाऊ... बाप रखुमा देविवरा पाहू..., ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...असा हरी नामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी, विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.हाती पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत. जणू हा भक्तीचा सागरच आहे.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३५ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिस विभागाच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले. तसेच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नगरपरिषदेच्यावतीने स्वागत
अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा प्रवेश ते सदाशिवराव माने विद्यालय या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने अकलूजकर नागरिकांनी पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले.
नेत्रदीपक रिंगण सोहळा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगण झाले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. येथे भाविक, वारकरी यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.
Related
Articles
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
अत्याचार करणार्यास जन्मठेप
23 Jul 2025
अभिनेते माल्कम वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू
23 Jul 2025
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
21 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
अत्याचार करणार्यास जन्मठेप
23 Jul 2025
अभिनेते माल्कम वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू
23 Jul 2025
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
21 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
अत्याचार करणार्यास जन्मठेप
23 Jul 2025
अभिनेते माल्कम वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू
23 Jul 2025
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
21 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
अत्याचार करणार्यास जन्मठेप
23 Jul 2025
अभिनेते माल्कम वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू
23 Jul 2025
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
21 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)