आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना   

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात अनेक विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरुच्या रुपात आयपीएल स्पर्धेत नवा चॅम्पियन संघही मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करत १७ वर्षांचा दुष्काळ संपवून पहिला आयपीएलचा चषक जिंकला. हा सामना टी-२० मधील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला आहे.
 
दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या मैदानावर खेळवण्यात आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना हा टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला. यंदाच्या हंगामात टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकूण ८४० अब्ज मिनटांपेक्षा अधिक वेळ चाहत्यांनी आयपीएल सामन्यांचा आनंद घेतल्याची नोंद झाली आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यातील वॉच टइमचा आकडा हा ३१.७ अब्ज मिनिटे इतका आहे. टेलिव्हिजनवर अंतिम सामन्याला विक्रमी १६९ दशलक्ष प्रेक्षकांसह १५ अब्ज मिनिटे वॉच टाइमची नोंद झाली. 

Related Articles