थेट कराचे संकलन घटले   

नवी दिल्ली : या आर्थिक वर्षात थेट कराचे संकलन १.३९ टक्क्यांनी घसरून ते ४.५९ लाख कोटीपर्यंत कमी झाले आहे. आगाऊ कराचे प्रमाण कमी झाल्याने आणि उच्च परतावा, ही त्यामागची कारणे असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 
 
आगाऊ कर हा कंपनीची नफाक्षमता आणि व्यक्तींचे उत्पन्न याचा निर्देशांक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत १ एप्रिल ते १९ जून २०२५ मध्ये ते प्रमाण ३.८७ टक्के वाढून १.५६ लाख कोटी झाले. पर्यायाने आगाऊ कराची वार्षिक संकलन वृद्धी २७ टक्के झाली. कंपन्यांनी आगाऊ कर ५.८८ टक्के भरला असून तो १.२२ लाख कोटी एवढा आहे. पण, वैयक्तिक करदाते आणि  कंपन्या सोडून एचयूएफ आणि संस्थांचा करभरणा २.६८ टक्के घटून तो ३३ हजार ९२८ कोटी झाला आहे. दरम्यान, आगाऊ कराचा भरणा हा जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च महिन्यात केला जातो. परतावा ५८ टक्के वाढून तो १९ जून अखेर ८६ हजार ३८५ कोटी रुपये दिला गेला आहे. एकंदरीत एकूण थेट कराचे संकलन ५.४५ लाख कोटी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४.८६ टक्के वाढ दिसून आली. सर्वसाधारणपणे एकूण थेट कराचे संकलन सुमारे ४.४९ लाख कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

Related Articles