रिषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम   

हेडिंग्ले: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने शतकी खेळी केली. तर ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी केली. दरम्यान दुसर्‍या दिवशी ऋषभने आपलंं शतक पूर्ण केलं. या खेळीसह त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला मागे सोडलं आहे.
 
शुबमन गिलने पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून शतकी खेळी करण्याचा कारनामा केला. तो पहिल्या दिवशी नाबाद १२७ धावांवर माघारी परतला. तर ऋषभ पंत ६५ धावांची खेळी करत नाबाद परतला. ऋषभ पंत आयपीएल २०२५ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. शेवटच्या सामन्यातील शतकी खेळी वगळली तर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करताच त्याने पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने एमएस धोनीला मागे सोडलं आहे. एमएस धोनीच्या नावे ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये ३०० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा सर्वात वेगवान यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंतने ७६ व्या डावात हा कारनामा केला आहे. या डावात ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज डम गिलख्रिस्ट अव्वल स्थानी आहे. त्याने हा कारनामा ६३ व्या डावात केला होता. या रेकॉर्डसह त्याने एमएस धोनीचा आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तो परदेशात फलंदाजी करताना आशियातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने एमएस धोनीला मागे टाकलं आहे. एमएस धोनीने १७६१ धावा केल्या होत्या. आता ऋषभ पंत १७४६ धावांवर पोहोचला आहे. याआधी हा रेकॉर्ड एमएस धोनी, फारुख इंजिनियर आणि सय्यद किरमानी या भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांच्या नावावर होता.

Related Articles