रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला   

किव्ह : रशियाच्या हवाई हल्ल्याचा बदला युक्रेनने मंगळवारी एका कारखान्यावर ड्रोन हल्ला करून घेतला. युक्रेनच्या सीमेपासून सुमारे १ हजार ३०० किलोमीटवर कारखाना होता. त्याला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले.
 
गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांत भीषण युद्ध सुरू आहे. एकमेकांच्या लष्करी आणि महत्त्वांच्या ठिकाणांना ते  लक्ष्य करत आले आहेत. त्यात ड्रोन, क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. गेल्या रविवारी रशियाने युक्रेनवर ४०० पेक्षा अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून आतापर्यंतचा मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्याचा बदला युक्रेनने काल कारखान्यावर ड्रोन हल्ला करुन घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी सांगितले होते की, रशियाकडून शस्त्रसामग्री असलेल्या ठिकाणांवर वारंवार हल्ले चढविले जात आहेत. गेल्या महिन्यांत ५ हजाराहून अधिक ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी रशियाने केला होता. 
 
हवाई हल्ले करण्याबरोबरच रशियाने लष्करी कारवाई करत युक्रेनच्या सीमेच्या आत सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंत मजल मारत भूभाग ताब्यात घेतला आहे. संघर्षबंदीसाठी अमेरिकेच्या नेतृत्वा खाली आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होत आहे. मात्र, त्यात यश मिळालेले नाही. 
 

Related Articles