इराणच्या अणु प्रकल्पाचे इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान   

तेहरान : इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येकडे २५० किलोमीटरवरील अराक येथील जड पाणी प्रक्रिया अणु प्रकल्पावर शुक्रवारी हल्ला करुन त्याचे मोठे नुकसान केले. या संदर्भातील उपग्रहाने टिपलेली छायाचित्रेही प्रकाशित करण्यात आली आहेत.अराक प्रकल्प स्थळाला खोनबाद असेही ओळखले जाते. प्रकल्पावर हल्लाकेल्यानंतरची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे समाज माध्यमांवर फिरली आहेत. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, प्रकल्पात अण्वस्त्र निर्मिती केली जात असल्याचा संशय होता.
 
संयुक्त राष्ट्राच्या अणु ऊर्जा संस्थेने हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून तेथे अणु विषयक साहित्य नसल्याचे म्हटले आहे  हल्ला झाल्याची छायाचित्रे मॅक्स टेक्नॉलॉजीने दिली असून त्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात नुकसान झाल्याचे दिसते. प्लुटोनियम निर्मिती करण्याची त्याची क्षमता असल्याचे आणि ते अण्वस्त्र निर्मितीचे महत्वाचे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते. 
 
भारतीय विद्यार्थ्यांना इराणचा मदतीचा हात
 
इराणमध्ये अडकलेल्या सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी इराण सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. त्या अंतर्गत हवाई निर्बंध हटविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा  मसहाद शहरातून विमानाने भारतात सुखरुप परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत इराणमधून  विमानांची उड्डाणे होतील, असे इराणच्या दूतावासचे अधिकारी महमद हुसैनी म्हणाले.

Related Articles