E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
फलटणजवळ दोन वारकऱ्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
Samruddhi Dhayagude
30 Jun 2025
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना रविवारी ( दि. २९) रात्री बरड (ता. फलटण) हद्दीत घडली. तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, नागपूर) व मधुकरराव तुकाराम शेंडे (५५, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी त्या मृत वारकऱ्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम साताऱ्यातील बरड (ता. फलटण) येथे होता. बरड येथील मुक्कामवेळी मृत वारकरी कपडे वाळत टाकण्यासाठी एका विजेच्या खांबाला दोरी बांधत असताना त्यांना हा विजेचा धक्का बसला. यामध्ये सुरुवातीला तुषार यांना हा धक्का बसला. त्यांना बाजूला करण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव यांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ उपचारासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रात्री बरड येथे मुक्कामी असताना ही घटना घडली. वासुदेव महाराज टापरे (रा.काटोल) यांच्या दिंडी मधील हे दोन्हीही वारकरी नागपूर जिल्ह्यातील विहार तालुक्यातील आहेत. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. वारी शेवटच्या टप्प्यात पंढरपूर नजीक असताना ही दुर्घटना घडल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Related
Articles
न्यायालयाचा निकाल धक्कादायक
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
ड्यूक कंपनीचा चेंडूवर स्टुअर्ड ब्रॉडकडून प्रश्नचिन्ह
19 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
न्यायालयाचा निकाल धक्कादायक
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
ड्यूक कंपनीचा चेंडूवर स्टुअर्ड ब्रॉडकडून प्रश्नचिन्ह
19 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
न्यायालयाचा निकाल धक्कादायक
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
ड्यूक कंपनीचा चेंडूवर स्टुअर्ड ब्रॉडकडून प्रश्नचिन्ह
19 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
न्यायालयाचा निकाल धक्कादायक
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
इंजिनियर राशीदला पॅरोल
23 Jul 2025
ड्यूक कंपनीचा चेंडूवर स्टुअर्ड ब्रॉडकडून प्रश्नचिन्ह
19 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)