शरीफ सोडून मुनीर यांना निमंत्रण पाकिस्तानसाठी लज्जास्पद   

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांचा टोला

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ऐवजी लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निमंत्रण दिले. ही बाब अतिशय लज्जास्पद असल्याचा टोला भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी लगावला आहे.
 
असीम मुनीर यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निमंत्रणा संदभार्ंत प्रश्न सिंह यांना  विचारला होता. त्यावर ते बोलत होते.  ते म्हणाले, शहाबाज यांना वगळून मुनीर यांना निमंत्रण देण्याचा प्रकार पाकिस्तानात कोणाची सत्ता आहे, तो कोण चालवतो, हे दिसते. दुसरीकडे शहाबाज पंतप्रधान असूनही त्यांना निमंत्रण दिले गेले नाही, ही बाब पाकिस्तानसाठी लज्जास्पद आहे. मी काही मोठा मत व्यक्त करणारा व्यक्ती नाही. मात्र, ही बाब नक्कीच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. लष्करप्रमुखाला एखादा देश निमंत्रण देतो, मेजवानी देतो. मात्र, पंतप्रधानाना बोलवत नाही, ही बाब अतिशय आश्चर्यकारक आहे. दरम्यान, सिंह यांनी पाकिस्तानला टोला लगावताना कोणाचेही नाव घेतले नाही.

Related Articles