अमरावती : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आज (शनिवारी) आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक़्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. विशाखापट्टणमच्या २६ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनार्यावर योग दिनाचा खास कार्यक्रम पहाटे साडेसहा ते सकाळ आठ वाजेपर्यंत आयोजित केला होता. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, भव्य कार्यक्रम होणार असल्याने त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. एका पृथ्वीसाठी योग, एक आरोग्य, असे कार्यक्रमाचे नाव आहे. त्यासाठी विशाखपट्टणमच नव्हे तर राज्यातून लाखो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी १०८ मिनिटे सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके सादर केली.
Fans
Followers