मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे   

बंगळुरु : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा बाबींवर निर्णय घेणे पक्षश्रेष्ठांचे काम आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे सांगितले.
 
काँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी राज्यातील नेतृत्व बदलाची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठांनी विचार केला आहे. योग्यवेळी डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. दोन ते तीन महिन्यांत मोठा राजकीय बदल होईल, असे म्हटले होते. 
 
राज्यात ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री बदलला जाणार का? असा सवाल खर्गे यांनी पत्रकारांनी केला. त्यावर खर्गे म्हणाले, याचा निर्णय पूर्णपणे पक्षश्रेष्ठांच्या हातात आहे. त्यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे कोणी सांगू शकत नाहीत. याबाबतचा निर्णय घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे सांगितले.

Related Articles