E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मेक्सिकोमध्ये धार्मिक उत्सवात बेछूट गोळीबार; १२ ठार
Samruddhi Dhayagude
27 Jun 2025
इरापुआटो : मेक्सिकोमधील इरापुआटो शहरात येथे बुधवारी रात्री उशिरा एका समारंभादरम्यान काही हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हिंसाचारग्रस्त ग्वानाहुआटो राज्यातील टर्नी जनरलच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात जखमी झालेल्या अन्य २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
’नेटिव्हिटी ऑफ जॉन द बॅप्टिस्ट’ हा कॅथोलिक सणाचा उत्सव नागरिक रस्त्यावर साजरा करत होते. यावेळी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्याशी संबंधित एक व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की उत्सवाच्या जल्लोषात अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि नागरिकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले. दरम्यान, या हल्ल्यात मृतांचा आकडा १२ वर पोहोचला असून, सुमारे २० जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष क्लॉडिया शीनबाम यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्वानाहुआटो सर्वांत हिंसाचारग्रस्त राज्य
गेल्या महिन्यातही ग्वानाहुआटोमधील सॅन बार्टोलो डे बेरिओस येथे कॅथोलिक चर्चने आयोजित केलेल्या एका पार्टीला लक्ष्य करून करण्यात आलेल्या गोळीबारात सात जण ठार झाले होते. मेक्सिको सिटीच्या वायव्येस असलेले ग्वानाहुआटो हे देशातील सर्वांत हिंसक राज्यांपैकी एक बनले आहे. येथे विविध संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. या वर्षात आतापर्यंत या राज्यात हत्येच्या एक हजार ४३५ घटना घडल्या आहेत.
Related
Articles
खेळाडूच्या वयापेक्षा कामगिरीकडे लक्ष द्या : फारुख इंजीनियर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
भारत-ब्रिटनमध्ये व्यापार करार
25 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
खेळाडूच्या वयापेक्षा कामगिरीकडे लक्ष द्या : फारुख इंजीनियर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
भारत-ब्रिटनमध्ये व्यापार करार
25 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
खेळाडूच्या वयापेक्षा कामगिरीकडे लक्ष द्या : फारुख इंजीनियर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
भारत-ब्रिटनमध्ये व्यापार करार
25 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
खेळाडूच्या वयापेक्षा कामगिरीकडे लक्ष द्या : फारुख इंजीनियर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
भारत-ब्रिटनमध्ये व्यापार करार
25 Jul 2025
इस्लामपूर आता होणार ईश्वरपूर!
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
समाविष्ट १६ गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी ५३३ कोटींचा निधी मंजूर
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)