एअर इंडियाची अवस्था बिकट; तिकीटांचे दर घसरले   

अहमदाबाद विमान दुर्घटना

अहमदाबाद : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाची  आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे एअर इंडियाची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे विमानांचे तिकीटाचे दर देखील कमी करण्यात आले आहेत
 
गेल्या आठवड्यात १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्यात २७० जणांचा मृत्यू झाला होता. विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.२२९ प्रवासी, २ पायलट आणि दहा विमान कर्मचारी यांचा समावेश होता. एअर इंडियाचे हे विमान बीजे वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळून डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबासह ३३ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या ओअर इंडियाच्या विमानांचे तिकीटाचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.  अशा परिस्थितीत एअर इंडिया स्वस्त तिकिटे देत असली तरी, हवाई प्रवासी त्यांच्या विमानांचे बुकिंग करण्यास प्राधान्य देत नाहीत. दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी सर्वात स्वस्त तिकीट एअर इंडियाचे आहे. दिल्ली ते मुंबई तिकीट फक्त ५ हजार रुपये, म्हणजे तुम्ही फक्त ५ हजार रुपयामध्ये मुंबईहून दिल्लीला जाऊ शकता.
 
दिल्ली-मुंबई मार्गावरील भाडे किती?
 
दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी, आम्ही एअर इंडियासह ४ विमान कंपन्यांची तिकिटे तपासली, ज्यामध्ये सर्वात स्वस्त तिकीट एअर इंडियाचे होते. २१ जून रोजी म्हणजेच शनिवारी दिल्ली ते मुंबई एअर इंडियाचे तिकीट बुक केले तर या तिकिटाची किंमत फक्त ५७१६ रुपये असेल, तर २१ जून रोजी त्याच मार्गावरील स्पाइसजेटच्या विमानाची किंमत ७६०२ रुपये असेल. अशा परिस्थितीत, इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाच्या विमानांचे दर किती स्वस्त आहेत याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता.

Related Articles