इराणमध्ये लष्करी अधिकारी अणु शास्त्रज्ञांवर अंत्यसंस्कार   

तेहरान : इस्रायलच्या हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेले इराणचे लष्करी अधिकारी आणि अणु शास्त्रज्ञांना शनिवारी शोकाकुल वातावरणात इस्लामिक क्रांती चौकात शनिवारी अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शहीदांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. . 
 
इराण आणि इस्रायल यांच्यात १२ दिवस भीषण संघर्ष झाला. तेव्हा इस्रायलच्या हल्ल्यात रेव्ह्यूलेशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसैन सलामी, क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे प्रमुख जनरल अमीर अली हाजीज़ादेह आणि अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. त्यांची अंत्ययात्रा राजधानी तेहरान येथील आझादी रस्त्यावरुन वाहनातून काढण्यात आली. सामूहिक अंत्यविधी इस्लामिक क्रांती चौकात (एंघेलाब स्क्वेअर) येथे झाला.  या वेळी  नागरिक अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून आले होते. अंत्ययात्रेच्या दुतर्फा नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि शहीद अधिकार्‍यांची छायाचित्रे असलेले फलक हातात धरले होते. डेथ ऑफ अमेरिका आणि डेथ ऑफ इस्रायलच्या घोषणाही त्यांनी दिल्या.
 
दरम्यान, १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध करुन इराणमधील लष्करी ठाणी, अणु केंद्रावर जोरदार हवाई हल्ले चढविले होते. त्यात सलामी और हाजीज़ादेह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिक़ार्‍यांचा आणि शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. अंत्ययात्रेत परराष्ट्र मंत्री अब्बास अरघाची, जनरल इस्माईल क्वानी, सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे सल्लागार जनरल शामखानी सहभागी झाले होते. ते हल्ल्यात जखमी झाले होते.

Related Articles