शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक   

पुणे-बंगळूरू महामार्ग रोखला

कोल्हापूर : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक वळवण्यात आल्याने शहरासह पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
 
आंदोलनादरम्यान, काही शेतकर्‍यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाने वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles