सातारकरांची मिटली पाण्याची चिंता   

कास तलाव जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरला 

सातारा, (प्रतिनिधी) : कास परिसरात गेला महिनाभर सतत पडणारा पाऊस व गेल्या चार दिवसांपासुन पडणार्‍या मुसळधार पावसाने कास तलाव जून महिन्यातच गुरुवारी सायंकाळी ओव्हरफ्लो झाला. यामुळे सातारकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कास तलाव ओव्हरप्लो होऊन वाहणार्‍या पाण्यामुळे भांबवली वजराई धबधब्याने आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. पाढर्‍या शुभ्र पाण्याने धबधबा फेसाळला आहे. त्यामुळे परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. 
 
दरम्यान, मुसळधार पावसामुळे उरमोडी नदीच्या पाणीसाठ्यात आता झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच या धरणातूनही विसर्ग केला जाईल. शेकडो वर्षापुर्वी सातार्‍याला पाणीपुरवठा करण्यासाठी कास तलावाची निर्मिती करण्यात आली. त्या तलावात पूर्वी पेक्षा तिन पट अधिक पाणीसाठा होण्यासाठी धरणाची उंची वाढवण्याचे काम दोन वर्षापुर्वी पूर्ण झाल्याने तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नवीन पाईप लाईनचेही काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सातारकरांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. यावर्षी पाण्याची पातली जास्त कमी झाली नव्हती व पावसानेही मे महिन्यातच आगमन केल्याने धरण जुन महिन्याच्या मध्यंतरीच ओव्हरप्लो होऊन पाणी वाहु लागले आहे. त्यामुळे सातारा शहरवासीयांच्या पाण्याची चिता मिटली असुन नगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक जास्त वेळ पाणी द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
सांडव्याला तिन टप्यात पायर्‍या बांधल्याने तलावातील ओव्हरफ्लो होऊन वाहणार्‍या पाण्यामुळे भुशी तलावाचा फिल येत आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे. त्यामुळे हे दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होणार असुन पर्यटकांना येथील पाण्यात उतरण्यास बंदी करण्यात आली आहे. 
तलावातुन ओव्हरफ्लो होऊन येणारे पाणी नजीकच्या वजराई धबधब्यातुन जात असल्याने पाण्याचा मोठा प्रवाह येऊ लागल्याने धबधब्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. तिन टप्यात कोसळणारे पाणी ओसंडुन फेसाळत असल्याने नयनरम्य नजारा पहायला मिळत आहे.

Related Articles