जयपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित आणि इतर गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलरला दिल्याबद्दल नौदलाच्या एका कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. विशाल यादव असे त्याचे नाव आहे. दिल्लीतील नौदल मुख्यालयात तो लिपिक या पदावर कार्यरत होता. तो हरयानातील रेवाडीचा रहिवासी आहे. ‘प्रिया शर्मा‘ या नावाने फेसबुकवरील बनावट खात्यावर एका महिला पाकिस्तानी हँडलरला तो गोपनीय माहिती पुरवत होता. यादव याने ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती ५० हजारांमध्ये पुरवली. त्याच्या मोबाईल फोनवर संवेदनशील कागदपत्रे सापडली आहेत. विशाल सुरुवातीला लहान-सहान माहितीसाठी पाच ते सात हजार घेत. अशा रीतीने त्याने दोन लाख घेतले. त्याला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Fans
Followers