यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप   

नवी दिल्‍ली : आयपीएलमधून प्रसिद्ध झालेला भारतीय क्रिकेटपटू यश दयाल एका मोठ्या वादात अडकला आहे. अलिकडेच आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या यश दयालवर एका महिलेने लैंगिक शोषण, हिंसाचार आणि फसवणूकीचा आरोप केला आहे. पीडित महिलेने सोशल मीडियावर पोस्टद्वारे यश दयालवर कारवाईची मागणी केली आहे.
 
लग्नाच्या बहाण्याने मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने यश दयालवर केला आहे. गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या महिलेने पीएम ऑनलाइन तक्रार पोर्टलवर हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलीस कारवाईत आले आहेत. वृत्तानुसार, इंदिरापुरमच्या सर्कल ऑफिसरने या प्रकरणाशी संबंधित अहवाल मागितला आहे. पीडित महिलेने या प्रकरणात न्यायासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्य पोलिसांकडे मागणी केली आहे.
 
14 जून 2025 रोजी महिला हेल्पलाइनवर सदर महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदर महिला म्हणाली की, गेल्या पाच वर्षांपासून मी यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या काळात गरज पडल्यास दयालने माझ्याकडून पैसेही घेतले होते. तसेच माझ्याव्यतिरिक्त इतर महिलांसोबतही यश दयालने असे कृत्य केले आहे, असा दावाही या महिलने केला आहे. सदर महिलेने यश दयालसोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट, व्हिडिओ कॉल हिस्ट्री आणि फोटो पुरावे म्हणून सादर केले आहेत. 
 
यश दयालची कारकीर्द
 
27 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी या युवा खेळाडूने रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

Related Articles