एअर इंडियाची आठ उड्डाणे रद्द   

चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश

मुंबई : एअर इंडियाने वाढती देखभाल आणि तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी आठ उड्डाणे रद्द केली. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश होता.प्रवाशांना गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचता यावे, यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.प्रवास रद्द केला तर, तिकिटाची रक्कम परत किंवा पुढचा प्रवास मोफत असे पर्याय विमान कंपनीकडून प्रवाशांना दिले जात आहेत.
 
काल रद्द करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रयीय उड्डाणांमध्ये दुबई ते चेन्नई एआय ९०६, दिल्ली ते मेलबर्न एआय ३०८, मेलबर्न ते दिल्ली एआय ३०९ आणि दुबई ते हैदराबाद एआय  २२०४ यांचा समावेश होता. याखेरीज, पुण्याहून दिल्लीला जाणारी एआय ८७४, अहमदाबादहून दिल्लीला जाणारी एआय ४५६, हैदराबादहून मुंबईला जाणारी एआय-२८७२ आणि चेन्नईहून मुंबईला जाणारी एआय ५७१ ही चार देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
 
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले होते. हे विमान रहिवाशी भागात कोसळले होते. विमानातील २४१ जणांसह एकूण २७० जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून उड्डाणापूर्वी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत अनेक उड्डाणे एअर इंडियाने रद्द केली आहेत. 

Related Articles