पुणे पोलिस आणि ओयोतर्फे चर्चासत्र   

पुणे : पुणे पोलिसांनी ओयोच्या भागीदारीत हॉटेल्समधील अनैतिक कृत्यांविरुद्धच्या लढाईत  विशेष मोहीम सुरू केली. याचा भाग म्हणून ओयो ब्रँडचा बेकायदेशीरपणे वापर करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करणे हे पोलिसांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक असेल.जागतिक हॉस्पिटॅलिटी टेक्नॉलॉजी कंपनी ओयोने पोलिसांसोबत भागीदारीत जागरूकता निर्माण करण्यासाठी, भागधारकांना शिक्षित करण्यासाठी आणि पुण्यातील हॉटेल्समधील अनैतिक कृत्यांविरुद्धच्या लढाईत सहयोगी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्र आयोजित केले. 
 
शहरातील ५० हून अधिक ओयो हॉटेल चालकांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी यात भाग घेतला. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, पुणे शहरात येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. हॉटेल कर्मचारी बहुतेकदा संरक्षणाची पहिली फळी असतात, संशयास्पद हालचाली ओळखण्याची आणि तक्रार करण्याची क्षमता त्यांच्यात असते.ओयोचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण जैन म्हणाले, आम्ही या चर्चासत्राद्वारे अनैतिक कृत्यांविरुद्धच्या लढाईत योगदान देण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहोत.

Related Articles