वारकर्‍यांना फराळ, छत्री आणि रेनकोटचे वाटप   

विश्रांतवाडी परिसरात सामाजिक संघटनांचा उपक्रम

विश्रांतवाडी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायीवारी सोहळा   शुक्रवारी पुण्यनगरीत दाखल झाला. तत्पूर्वी कळस, विश्रांतवाडी परिसरात पालखीचे आगमन होताच ’ज्ञानेश्वर माऊली’, ’विठू नामाचा अखंड जयघोष’, टाळ मृदुंगाचा आणि अभंगाचे स्वराने आळंदी रस्ता भाविकांनी भक्तीरसात रसात नाहून निघाला. 
  
कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर येरवडा परिसरातील माऊली भक्तांनी मोठ्या जल्लोषात भक्तीतमय वातावरणात इंदीरानगर येथील दत्ता मंदिरात पालखी विसावलेल्या या सोहळ्यात माउलींच्या पादुकांचे लाखो भक्तांनी सहज व सुलभ दर्शन घेतले. दत्त मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावंत आणि माजी नगरसेविका शीतल सावंत यांनी माऊलींच्या  पालखीला नैवद्य दाखविला आणि दर्शन घेतले.या दरम्यान  भक्तांना दर्शनासाठी ट्रस्टचे  पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सुरक्षा व्यवस्था पाहिली या दरम्यान वारकर्‍या महिला अधिकार्‍यांचे कौतुक करून आभार मानले. यंदा दत्त मंदिरात माऊलीची पालखी उशीरा आल्याने अनेक भक्तांचे डोळे पालखीकडे लागली होती, परंतु माउलींच्या पादुका दर्शनसाठी लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. 
 
धन्य आज संत दर्शनाचा !
अनंत जन्मीचा शिण गेला !!
मज वाटे त्यांशी अलीगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे !!
 
या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा ठेकून स्वता:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण परिसर  चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. या दरम्यान राजकीय, सामाजिक,संघटना, संस्था, डॉक्टर, व्यापारी, तसेच सर्व धर्मीयांनी वारकर्‍यांना चहा, बिस्कीट, पाणी, फराळ, फळे, तसेच विविध उपयोगी वस्तूंची वाटप केले. २.५९ वाजता विश्रांतवाडीच्या चौकात येताच माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी विविध वस्तू, खाद्य पदार्थ, सर्वांसाठी मोफत अन्नदान करून अनेक पंगती उठविल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही वारकर्‍यांनी तपासणी करून घेतली. त्यांना औषधे मोफत देण्यात आली. आमदार  बापूसाहेब पठारे व माजी आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे यांच्या वतीने पालखीचे स्वागत केले.
 
आरोग्यसेवेसह फराळ वाटप 
 
कळस म्हस्के वस्ती येथील माजी नगरसेवक सतिश म्हस्के व मिनाक्षी म्हस्के  यांनी वारकर्‍यासाठी आरोग्य सेवा दिली. यामध्ये औषधे, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या. राजगिरा लाडू, छत्री वाटप केले.सुरेंद्र बापूसाहेब पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी  आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून औषध उपलब्ध करून दिली, तसेच फराळ, पाण्याच्या बाटल्या, तसेच उपयोगी वस्तूचे वाटप केले.
 
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी वारकर्‍यांचे स्वागत करून फराळ वाटप केले. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय व पूजा जाधव यांनी मोफत पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट, उपवासाचे फराळ, जेवण्याचे पॅकीट, राजगिर्‍याचे लाडू, तसेच धनंजयभाऊ जाधव फाउडेंशनच्या वतीने कापडी पिशव्याचे वाटप केले. या दरम्यान विनोद परांडे, मोनिका परांडे, गणेश सोनवणे, राजू फाले, प्रणय शेंडे, व्दारकेश जाधव, हेमंग दाभाडे, कुणाल शिंदे, किरण आंब्रे, प्रविण दोडके, किशोर थेऊरकर, समीर सय्यद उपस्थित होते.
 
एकता फाऊंडेशनतर्फे वारकर्‍यांची सेवा
 
एकता फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश परदेशी यांनी यंदाही वारकर्‍यांची सेवा करून अन्नदान, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, फराळ, रेनकोटचे वाटप केले. या उपक्रमास महेश परदेशी, सुशील शिंदे, विक्रांत अतिश भोसले, सार्थक साठे, सुनिल कुसाळकर, विनीत गायकवाड, अनिल कांदेकर यांनी सहकार्य केले.आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नुकतेच शिवसेनेत गेलेले यश चौव्हान यांनी बिस्कीट, पाणी, फळे, चहा वाटप केले. या प्रसंगी, सतिशशेठ आगरवाल राहुल मंडगेल, नपुर  चौव्हान, रोहन चैाव्हाण, अप्पा बनसोडे, बबलु गलियल यांनी विशेष सहकार्य केले.      
 
मनसेचे गणेश पाटील यांनी मोफत फराळ व लाडू, शेंगदाणे, पाणी,  बिस्कीट,   वाटप केले. तसेच  सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव, दीपिका रामभाऊ जाधव,  फराळ आणि पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. तसेच लक्ष्मण काते यांनी वारकर्‍यांना विविध वस्तू आणि फराळ, पाणी वाटप केले.उद्योजक सतिश सावंत यांनी विविध उपक्रमातून वारकर्‍याची सेवा केली.   माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी  फराळ व आरोग्य तपासणी उपक्रम राबविला.  माता जिजाऊ प्रतिष्ठान धानोरीच्या वतीने अनिल (बॉबी) टिंगरे व विशाला टिंगरे यांनी फळे, फराळ, बिस्कीट, पाणी बाटल्या वाटप केले.  
 
युवा सोशल फाउंडेशन व लोक विकास संघटनेच्या वतीने बिस्कीट, फराळ,पाण्याच्य बाटल्या वाटप केल्या. या दरम्यान फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल टिंगरे, कोमल कुणाल टिंगरे, तसेच संघटनेचे अध्यक्ष अभिजीत उकारडे, हणमंत कुटे यांनी हा उपक्रम राबविला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते विनोद पवार यांनी दिंडीतील वाकर्‍यांना अन्नदान केले. काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष राजू ठोंबरे, सोनाली ठोंबरे, यांच्या वतीने बिस्कीट, राजगिरा लाडू, पाण्याच्या बाटल्याचे वाटप केले. या दरम्यान उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी फराळ, पाणी, बिस्कीट,  विविध वस्तूचे वाटप केले.
 
क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या वंशजानी माऊली पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची सेवा केली. कुणाल साळवे, केतन साळवे, कृष्णा साळवे, नंदा साळवे, तेजश्री साळवे, अर्चना साळवे, कांचन साळवे सहभाग घेतला.येरवडा येथील युपी हॉटेल गुरूव्दारा दशमेश दरबार यांच्या वतीने लाखो भाविकांना अन्नदान, पाणी आणि चहाचे वाटप केले. यावेळी ग्यानी हरदिप सिंग, दर्शन सिंग,परमजीत सिंग, गिता गुरूजीत सिंग, उपरीत  कौर, शितल गावडे, मनप्रीत कौर यांनी वारकर्‍यांची सेवा केली.

Related Articles