आपलेपणाच्या सूत्रात संघाला हिंदूना बांधायचे   

डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन 

पुणे : समाजाला आपलेपणाचा विसर पडत आहे. याची जाणीव संघ समाजाला करून देत आहे. जगाला एकसंघ करण्याचे काम हिंदू करत आहेत. आपलेपणाच्या सुत्रात हिंदू समाजाला बांधायचे हे संघाचे सुत्र आहे. कारण संघाचे काम मनुष्यत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 
 
आयुर्वेद समाजसेवा संशोधन आणि राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या वतीने ‘दर्शन योगेश्वराचे-आयुर्वेद भास्कर वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजुुमदार, वैद्य विनायक खडीवाले, संगीता खडीवाले, डॉ. राजीव ढेरे आदी उपस्थित होते. हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. 
 
भागवत म्हणाले, आपण एकाच तत्वाचे निरनिराळे अविष्कार आहोत. संघ कोणतीच कामे बैठकीत ठरवून करत नाही. समाजाच्या आवश्यकतेनुसार स्वयंसेवक कामाला सुरूवात करतात. ते काम सुरूच राहते. जेव्हा गरज भासते तेव्हा मात्र संघ त्यांच्या पाठिशी उभा राहतो. आदर्श व्यक्ती प्रकाशवाट निर्माण करतात. त्यामुळे आपलेपणाची वाट चोखाळणारी माणसे कायम सोबत आसली पाहिजे. त्यांच्या कृतीने अंधारलेल्या वाटश प्रकाशमय होतात. त्या प्रकाशात समाज उजाळून निघतो, असेही भागवत यांनी सांगितले. 
 
शां. ब. मुजुमदार म्हणाले, पुण्यात अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. मात्र पुण्यासह संपूर्ण राज्यात स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ नाही. त्याचा परिणाम म्हणून विद्यापीठात आयुर्वेद विषय शिकविला जातो. मात्र, त्या विषयाचे संशोधन होत नाही. पुण्यात आयुर्वेद विद्यापीठाची नितांत गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयुर्वेद विद्यापीठासाठी संघाने प्रयत्न करावेत. अशी विनंती मुजुमदार यांनी केली. रोहित जोगळेकर व अनंत निमकर यांनी परिचय करून दिला. तनुजा राहणे, गिरीश दात्ये यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्नेहल दामले यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. राजीव खरे यांनी आभार मानले. 

आयुर्वेद विद्यापीठाचे काम सुरू करा

कोणाची वाट पाहून कामे होत नाहीत. तसेच वाट पाहून समाजाचा विकासही होत नाही. पुण्यात आयुर्वेद विद्यापीठाची गरज आहे, तर मग विद्यापीठाच्या कामाला सुरूवात करा, चांगली कामे आपोआप होतात. त्या कामाच्या पाठीमागे कोणती ना कोणती शक्ती उभी राहते. जेथे गरज तेथे संघही मदतीला धावून येतो. संघ कोणत्याही कामासाठी बैठक घेत नाही. तर स्वयंसेवक समाजाच्या आवश्यतेनुसार कार्य करतात. असे सूचक वक्तव्य करून मोहन भागवत यांनी केले. 
 

Related Articles