E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
शिक्षक भरतीसाठी बारा हजाराहून अधिक अर्ज
Wrutuja pandharpure
27 Jun 2025
उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस
पुणे
: राज्यात शिक्षक भरतीच्या दुसर्या टप्प्यात मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १८६१ व्यवस्थापनातील ८५५६ रिक्त पदांपैकी ८२६४ पदांसाठी १२९६६ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांची आता मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये सुमारे ११ हजार पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. तर दुसर्या टप्प्यात मुलाखतीविना प्रकारात एकूण १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. आता मुलाखतीसह प्रकारातील पदभरती राबवण्यात
येत आहे.
या पार्श्वभूमीवर, मुलाखतीसह पदभरतीसाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये एकवाक्यता आणणे आणि उमेदवारांचे योग्यरीत्या मूल्यमापन होण्यासाठी शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी, इयत्ता अकरावी ते बारावी, अध्यापक विद्यालये या गटातील व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
८१ व्यवस्थापनांची १७७ पदे रद्द
विविध प्रशासकीय कारणास्तव ८१ व्यवस्थापनांची एकूण १७७ पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही. संबंधित व्यवस्थापनांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
Related
Articles
कळंबमधील शंभर वर्षे जुना पूल धोकादायक
19 Jul 2025
वाचक लिहितात
24 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
कळंबमधील शंभर वर्षे जुना पूल धोकादायक
19 Jul 2025
वाचक लिहितात
24 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
कळंबमधील शंभर वर्षे जुना पूल धोकादायक
19 Jul 2025
वाचक लिहितात
24 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
कळंबमधील शंभर वर्षे जुना पूल धोकादायक
19 Jul 2025
वाचक लिहितात
24 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)