यशस्वी जैस्वालचे शानदार शतक   

लीड्स : भारत वि. इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली. शुक्रवारी पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळवला गेला यामध्ये यशस्वी जैस्वाल याने १५९ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याने शानदार शतक साकारले. त्यामुळे भारतीय संघ ६६.४ षटकांत २६६ धावांवर आहे. यावेळी ३ फलंदाज बाद झाले आहेत. त्याच्या या शतकामुळे भारतीय संघाला अनेक दिवसांनी शतक पाहण्यास मिळाले. त्यानंतर स्टोक्स याच्या गोलंदाजीवर जैस्वाल हा त्रिफळाबाद झाला. तर शुभमन गिल ८९ धावांवर खेळत आहे. तर के.एल.राहुल हा ४२ धावांवर बाद झाला. त्याला ब्रायडन कार्से याने रूटकडे झेलबाद केले. साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. त्याला स्टोक्स याने जेमी स्मिथकडे झेलबाद केले. पंत १४ धावांवर खेळत आहे.इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी सलामीला उतरली. या दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. यासह त्यांनी ३९ वर्षे जुना विक्रम मोडला. 
 
यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरूवात करून दिली. लीड्सच्या मैदानावर राहुल आणि जैस्वाल यांच्या जोडीने कोणतीही विकेट न गमावता ६४ धावांचा टप्पा ओलांडताच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. या जोडीने सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांचा ३९ वर्षांचा जुना विक्रम मोडला. लीड्सच्या मैदानावर होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरादाखल, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी सलामीला उतरली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या बळीसाठी ६५ धावांची भागीदारी करताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम जोडला गेला. १९८६ मध्ये लीड्सच्या मैदानावर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत या सलामी जोडीने सलामीच्या सामन्यात ६४ धावांची भागीदारी केली होती. आता हा ३९ वर्षे जुना विक्रम यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी मोडला. जैस्वाल आणि राहुल यांच्यातील ही भागीदारी आता लीड्सच्या मैदानावर भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली. पहिल्या सत्रात शानदार सुरूवात केल्यानंतर भारताला लंच ब्रेकच्या आधी लागोपाठ दोन धक्के बसले. पहिल्या सत्राच्या शेवटी राहुल बाद झाला. त्याने ७८ चेंडूत आठ चौकारांसह ४२ धावा केल्या आणि सलामीची भागीदारी ९१ धावांवर तोडली. त्यानंतर पदार्पण करणारा साई सुदर्शन जास्त काळ टिकू शकला नाही आणि खाते न उघडताच बेन स्टोक्सच्या जाळ्यात अडकत बाद झाला.  साई त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीच्या पहिल्या चार चेंडूत खाते न उघडता बाद झाला. 

Related Articles