E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राज्यातील १४७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
पुणे
: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी नुकतीच जाहीर केली. त्यासह राज्यभरात ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश जाहीर (लोकेशन) झालेल्या १४७ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मराठी, इंग्रजीसह उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षणीय आहे.
यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया पहिल्यांदाच राज्यभर ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे पहिली निवडयादी जाहीर करण्यास विलंब झाला. मात्र, नुकतीच निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या यादीसह क्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश जाहीर केलेल्या १४७ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने तयार केली आहे. या यादीत मुंबई, पुणे, लातूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, रायगड, नंदूरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, बीड, सांगली, यवतमाळ अशा ठिकाणच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने मराठी, इंग्रजी माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. मात्र, त्यात उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्याही लक्षणीय आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर म्हणाले, प्रवेशक्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश १४७ महाविद्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले आहेत. यात महाविद्यालयांच्या यादीत इंग्रजी, मराठी, कन्नड, उर्दू माध्यमाची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. उर्दू माध्यमाची कनिष्ठ महाविद्यालये बहुतांश ग्रामीण भागात आहेत. तेथे उपलब्ध असलेल्या जागाही कमी आहेत. दहावीपर्यंत इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा त्याच माध्यमाकडे असल्याने त्या महाविद्यालयातील उपलब्ध जागांवर ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश जाहीर झाले आहेत.
Related
Articles
’महापूर’ नाट्यप्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद
22 Jul 2025
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा
21 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
श्रीशंकरला सुवर्णपदक
21 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
आशियातील दोन देशांच्या सीमेवर गोळीबार, युद्धपूर्व तणाव...

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना