भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले   

२०२५ मध्ये साडेतीन हजार श्रीमंत भारत सोडून परदेशात स्थायिक होण्याचा अंदाज 

नवी दिल्ली : जगभरात सध्या सुरु असलेली युध्दे बघता एकंदरीतच नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. या परिस्थितीमुळे भारतीयांच्या आणि विशेषतः करोडपती नागरिकांमध्ये स्थलांतरित किंवा इतर देशात स्थायिक होण्याचे प्रमाण देखील आपोआप कमी झाले आहे. 'हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन'चा अहवाल २०२५ नुकताच सादर केला. 
 
भारतातील संपत्ती स्थलांतर काहीसे मंदावल्याचे या अहवालातून समोर आले. कारण काळानुसार देश सोडून परदेशात स्थायिक होण्याची अपेक्षा असलेल्या करोडपतींची संख्या आता कमी झाली आहे. 'हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन' अहवाल २०२५ नुसार, २०२५ मध्ये ३,५०० भारतीय करोडपती परदेशात स्थायिक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
२०२३ मध्ये ५,१०० भारतीय करोडपती भारत सोडून जातील आणि २०२४ मध्ये ४,३०० करोडपती परदेशात स्थायिक होण्यासाठी भारत सोडतील अशी अपेक्षा होती. पण या परिस्थितीत घट होताना दिसते. 
 
'हेन्ली अँड पार्टनर्स'चा अंदाज आहे की, भारतातून स्थलांतरित होणाऱ्या करोडपतींची अंदाजे संपत्ती $२६.२ अब्ज असण्याचा अंदाज आहे. २०१४ ते २०२४ भारतातील करोडपतींची संख्या ७२% ने वाढली. पण, एकंदरीतच देशाबाहेर स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या करोडपतींमध्ये एकूण ट्रेंड वाढत आहे.
 
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थलांतर सल्लागार कंपनी 'हेन्ली अँड पार्टनर्स'ने प्रसिद्ध केलेल्या हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२५ मध्ये ज्यांची गुंतवणूक क्षमता १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक डॉलरची आहे त्यांचा विचार या पाहणीत केला आहे. २०२५ या वर्षातील आकडेवारी ही तात्पुरती आहे वर्षभरातील आर्थिक व्यवहारांवर निश्चित केली आहे. 

इंग्लंडला सर्वाधिक फटका बसणार 

अहवालात या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर १४२,००० करोडपती स्थलांतरित होण्याचा अंदाज आहे, तर लंडनमधील श्रीमंत त्यांच्या देशातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. २०२६ मध्ये ही आकडेवारी एक कोटी ६५ हजार श्रीमंत हे इतरत्र स्थलांतरित होण्याचा अंदाज आहे. 
 
आज प्रकाशित झालेल्या 'हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन' अहवालानुसार २०२५ मध्ये इंग्लंड १६,५०० करोडपती गमावण्याचा अंदाज आहे. हा वेग चीनमधून बाहेर पडणाऱ्या श्रीमंतांपेक्षा दुप्पट आहे. इंग्लंडमध्ये २०२४ पासून बदलेली ही कर रचना ऑक्टोबर २०२४ च्या अर्थसंकल्पात भांडवली नफा आणि वारसा करांमध्ये तीव्र वाढ केली, तर अनिवासी रहिवासी आणि कुटुंबाच्या संपत्ती संरचनांना यावर लक्ष्य करणाऱ्या नवीन नियमांमुळे काही जण "वेक्झिट" करू इच्छितात. 'वेक्झिट' म्हणजे 'वेल्थ एक्झिट' संपत्तीचा ओघ बाहेर जाणे. 

संयुक्त अरब अमिराती पहिल्या क्रमांकावर कायम 

जगातील आघाडीच्या संयुक्त अरब अमिरातीने जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्याचा पहिला मान कायम ठेवला आहे. सौदी अरेबियाने यंदा ९८०० पेक्षा जास्त श्रीमंत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. रियाध आणि जेद्दाहमध्ये परतणाऱ्या नागरिकांच्या आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे राज्याला फायदा होत आहे.
 
दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. दोन हजार पेक्षा जास्त श्रीमंत स्थलांतरित होण्याची शक्यता तसेच या वर्ष अखेरीस ७५०० नवे श्रीमंत स्थलांतर करत अमेरिकेत येतील अशी अपेक्षा आहे. 
 
श्रीमंत गुंतवणूकदार व्यक्ती दुबई, मोनाको आणि माल्टा सारख्या कर-अनुकूल अधिकार क्षेत्र असेलेल्या देशांत तसेच इटली, ग्रीस, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड यासारख्या जीवनशैलीला अनुरूप अशा ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. बरेच उच्च उत्पन्न व्यक्ती दुबई, फ्लोरिडा, मिलान, सेंट ज्युलियन, लिस्बन, अथेनियन रिव्हिएरा, झुग आणि लुगानो या ठिकाणी संपत्ती केंद्रित होण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 
युरोप सोडून इंग्लंड, भारत, रशिया, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत आकर्षक सुवर्ण व्हिसा पर्यायांमुळे गुंतवणूकदार सौदी अरेबिया सारख्या ठिकाणांना प्राधान्य देतात. या वर्षीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर सौदी अरेबिया सर्वाधिक वेगाने परकीय गुंतवणूकदार आणणारा देश आहे, २०२५ मध्ये २,४०० हून अधिक नवीन करोडपतींचा ओघ दिसण्याचा अंदाज आहे. 
 
'हेन्ले अँड पार्टनर्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जुर्ग स्टेफेन म्हणतात की, ही तीव्र तफावत जागतिक आर्थिक बदलांवर, धोरणात्मक संपत्ती स्थलांतराचा वाढता प्रभाव अधोरेखित करते. "२०२५ हा एक महत्त्वाचा क्षण आहे. गेल्या दशकात पहिल्यांदाच, एका युरोपीय देशाने करोडपतींच्या स्थलांतरात जगात आघाडी घेतली. हे केवळ कर व्यवस्थेतील बदलांमुळे नाही. हे स्थलांतर आणखी काही गोष्टी अधोरेखित करते. श्रीमंतांमध्ये अधिक संधी, स्वातंत्र्य आणि स्थिरता इतरत्र आहे. हे निकष आणि स्पर्धा देखील अधोरेखित करते. युरोप आणि इंग्लंडच्या आर्थिक स्पर्धात्मकता आणि गुंतवणुकीच्या आकर्षणासाठी दीर्घकालीन परिणाम महत्त्वपूर्ण आहेत."
 
इंग्लंड या संघर्षात एकटा नाही. पहिल्यांदाच, युरोपियन युनियनच्या दिग्गज फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांना २०२५ मध्ये निव्वळ श्रीमंतांच्या स्थलांतरितांचा तोटा होण्याची शक्यता आहे. अनुक्रमे ८००, ५०० आणि ४०० करोडपती बाहेर जाण्याचा अंदाज आहे.
 
सिंगापूर (+१,६००), ऑस्ट्रेलिया (+१,०००), कॅनडा (+१,०००) आणि न्यूझीलंड (+१५०) सारखी पारंपारिक ठिकाणे देखील श्रीमंत उद्योजकांना आकृष्ठ करण्यात कमी पडत असल्याचे दिसते. या वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये या देशांत सर्वांत कमी स्थलांतरित श्रीमंत येण्याची शक्यता आहे. 
 

Related Articles