कसोटीपटूंनी वाहिली विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली   

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे सुरू झाला. जिथे इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने एक नवीन सुरुवात केली आहे. आणि संघ प्रथम फलंदाजी करत आहे. साई सुदर्शनला चेतेश्वर पुजाराकडून कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली आणि त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 
सामना सुरू होण्यापूर्वी, स्टेडियममध्ये दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले. या दरम्यान, भारत आणि इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
 या सामन्याद्वारे, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासाठी स्टेडियममध्ये एक मिनिट मौन पाळण्यात आले. १२ जून रोजी गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान क्रश झाले. या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.
 
अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत एका हॉस्टेलवर क्रश झाले, ज्यामुळे विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला आणि या अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली.  त्याच वेळी, हॉस्टेलमधील अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. अहमदाबाद विमान अपघातात एकूण २७० लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने केवळ भारतातील लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या अपघाताबद्दल ईसीबी आणि बीसीसीआय त्या लोकांना श्रद्धांजली वाहत आहेत.
 
या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसारखे स्तंभ नाहीत, त्यामुळे भारतासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. संघाचे नेतृत्व शुभमन गिल पहिल्यांदाच करत आहे, जो २००२ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याचा प्रयत्न करेल. कारण २००७ पासून त्यांनी इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.  
 
पहिल्या कसोटी भारतविरुद्ध इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
भारताची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 

Related Articles