थेरगावात पार्किंगमधील चार दुचाकी पेटविल्या   

पिंपरी : इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञात व्यक्तीने आग लावून चार दुचाकींना जाळल्या. ही घटना शनिवारी पहाटे थेरगाव येथील कन्हैय्या पार्क परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम मनोज गायकवाड (३०,थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गौतम गायकवाड यांनी त्यांची दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी गायकवाड यांची दुचाकी, त्यांच्या शेजारी राहणारे अवधूत राजाराम ढगे, विश्वंभर लक्ष्मण धनलोभे, रामु बाबू नावंदे यांच्या एकूण चार दुचाकींना पेटवून दिल्या. यात अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles