पक्षातील काही नेत्यांशी मतभेद : थरुर   

तिरुअनंतपुरम : काँग्रेस नेतृत्वातील काही नेत्यांशी आपले मतभेद असल्याचे काँग्रेस कार्यकारिणी सदस्य शशी थरुर यांनी गुरुवारी सांगितले. पण, काँग्रेस, पक्षाची मूल्ये आणि कार्यकर्ते मला खूप प्रिय आहेत, असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय सात शिष्टमंडळे विविध देशांच्या दौर्‍यावर पाठवली होती. यामध्ये थरुर यांचा सहभाग होता. त्यावेळी थरुर यांनी मोदी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यावरून, थरुर यांना पक्षांतर्गत टीकेला सामोरे जावे लागले होते.
 
थरुर पुढे म्हणाले, ‘मागील १६ वर्षांपासून पक्ष कार्यकर्त्यांसमवेत मी जवळून काम केले आहे. मी त्यांना जवळचे मित्र आणि भाऊ मानतो. परंतु, पक्ष नेतृत्वातील काहींशी माझे मतभेद आहेत. मी कशाबद्दल बोलत आहे, हे तुम्हाला माहिती आहे. 

Related Articles