स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार   

एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई, (प्रतिनिधी) : आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तर, दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. ते बाळासाहेबांचे वारसदार कसे होणार? असे टीकास्त्र शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर सोडले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी शिवसेनेच्या दोन गटाचे स्वतंत्र मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप आणि शिंदे यांच्या सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिंदे यांनीही उद्धव यांच्यावर टीका केली. आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. हिंदुत्वाचा भगवा आपल्याकडे आहे. शिवधनुष्य आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वाद देखील आपल्याकडे आहे, असे शिंदे म्हणाले. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या लोकांचा विरोध केला. त्यांच्याच दावणीला शिवसेना बांधण्याचे काम काही लोकांनी केले होते. 
 

Related Articles