सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा   

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ‘आप’चे माजी मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुरुवारी कथित भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला. 
 
या दोघांवर मागील सरकारमध्ये असताना आरोग्यविषयक उपकरण खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री भारद्वाज आणि जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एसीबीकडून चौकशी करण्यास मान्यता दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आम आदमी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Related Articles