राजोडी समुद्रकिनार्‍यावर आढळला ८ फुटांचा मृत डॉल्फिन   

वसई : वसई पश्चिमेच्या राजोडी समुद्र किनार्‍यावर डॉल्फिन मृत अवस्थेत आढळून आला आहे. सुमारे आठ फूट लांबीचा व १२५ किलोग्रॅम वजनाचा हा डॉल्फिन आहे. या मृत डॉल्फिन माशाला महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यात पुरण्यात आले आहे.
 
वसई पश्चिमेच्या भागात राजोडी समुद्र किनारा आहे. या किनार्‍यावर सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. बुधवारी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना किनार्‍यावर मृत अवस्थेत डॉल्फिन आढळून आला. 

Related Articles