शेतजमिनीच्या वादातून वर्ध्यात दोघांची हत्या   

आरोपीची आत्महत्या

वर्धा : शेतजमिनीच्या वादातून वर्ध्यातील निमसडा येथे पुतण्याने काकू आणि चुलत भावाची हत्या केली. त्यानंतर स्वत: विष प्राशन करत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी निमसडा येथील शेतशिवारात ही घटना घडली. 
 
साधना मोहिजे (वय ५५), नितीन मोहिजे (२७, रा. निमसडा) अशी हत्या झालेल्यांची नाव आहेत. महेंद्र मोहिजे (वय ४५) असे मृत आरोपी पुतण्याचे नाव आहे. साधना मोहिजे आणि त्यांचा मुलगा नितीन मोहिजे शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात होते. त्यावेळी शेतीवरून वादातून महेंद्र मोहिजे याने साधना मोहिजे, नितीन मोहिजे यांची कुर्‍हाडीने वार करून हत्या केली. यातच महेंद्र मोहिजे यानेही स्वत: विष प्राशन केले. महेंद्रला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिस अधीक्षक अनुराग जैन आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपास अल्लीपूर पोलिस करीत आहेत.

Related Articles