ऑस्ट्रेलियाच्या बाजूने तिसर्‍या पंचांने निर्णय दिल्यामुळे सामन्यादरम्यान गोंधळ   

बार्बाडोस : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ही मालिका वेस्ट इंडिजच्या घरच्या मैदानावर असून ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १८० धावांवर सर्वबाद झाला. तर दुसर्‍या डावात वेस्ट इंडिजचा संघ फक्त १८० धावाच करू शकला. तर दुसर्‍या डावात आता ऑस्ट्रेलिया संघाने पंचांच्या निर्णयाच्या जोरावर आघाडी घेतली आहे. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर ८२ धावांची एक छोटीशी पण महत्त्वाची आघाडी मिळवली, कारण पंचांच्या वादग्रस्त निर्णयांच्या मालिकेने या सामन्याला रोमांचक वळण दिले. कसोटीच्या दुसर्‍या दिवशी वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं आणि फलंदाजांचा धावा करण्यासाठी कस लागला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १८० धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ४ बाद ५७ धावांसह दुसर्‍या दिवशी सुरूवात केली. सकाळच्या सत्रात कर्णधार रोस्टन चेस आणि पुनरागमन करणारा कसोटी फलंदाज शे होप यांच्यात ६७ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे यजमान संघ पहिल्या डावात आघाडी मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होते. परंतु लंचच्या दरम्यान तिसर्‍या पंचांच्या दोन वादग्रस्त निर्णयांमुळे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केलं.
 
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस कमिन्सच्या गोलंदाजीवर ४४ धावांवर पायचीत झाला. त्याने लगेचच लगेचच रिव्ह्यूची मागणी केली आणि त्याला खात्री होती की चेंडू बॅटला लागून पॅडला लागला आहे. पण तिसर्‍या पंचांनीही त्याला रिव्ह्यू पाहिल्यानंतर बाद दिलं. पंचांच्या निर्णयामुळे रोस्टन चेस १०८ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा करत बाद झाला. रोस्टन चेसच्या विकेटनंतर काही वेळातच चार वर्षांनंतर पहिलाच कसोटी सामना खेळणार्‍या शे होपला ब्यू वेबस्टरने अ‍ॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केलं. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाने पुढे जाऊन एका हाताने झेल घेतला. टेलिव्हिजन रिप्लेवरून असे दिसून आले की चेंडू मैदानावर आदळला असावा, परंतु थर्ड अंपायर एड्रियन होल्डस्टॉकने ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूने निकाल दिला. होप ४८ धावांवर बाद झाल्याने विंडिजचा संघ बॅकफूटवर गेला. लंचब्रेकपूर्वी पाच बाद १३५ धावांवरून यजमान संघ १९० धावांवर गारद झाला आणि १० धावांची आघाडी घेतली. 
 

Related Articles