शक्तिपीठ मार्गासह विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ५३ हजार ३५४ कोटींची तरतूद करा   

फडणवीस यांच्या सूचना

मुंबई, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असतानाही नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रेटून नेण्याचे  राज्य सरकारने ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत शक्तिमार्गासह राज्यातील ११ महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणार्‍या  ५३ हजार ३५४ कोटींच्या निधीची तरतूद करण्याची सूचना बैठकीत केली. राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच, भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.फडणवीस यांनी काल आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी  महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला.  

Related Articles