चेंबरचे खोदकाम करताना गॅस वाहिनी तुटली   

खराडी परिसरात भीतीचे वातावरण  

वडगावशेरी : खराडी परिसरात रस्ता खोदताना गॅस वाहिनी तुटल्याची घटना घडली. परंतु कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना जुना मुंढवा रस्त्यावरील राघवेंद्र ड्रायक्लीनर्स समोरील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची दुरस्ती करताना जेसीबी फटका बसून गॅस वाहिनी फुटली. मात्र, अशा बेजबादार ठेकेदार आणि अधिकार्‍यांमुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
या भागात अनेक दिवसांपासून मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर तुडुंब भरलेले होते. त्याच्या दुरूस्तीसाठी सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू केले होते. खोदकाम करताना गॅस वाहिनीला मोठा तडा गेला त्यामुळे गॅस सर्वत्र पसरू लागला. परंतु कर्मचार्‍याच्या सतर्कपणामुळे मोठा अनर्थ टळला.
 
या घटनेची सखोल चौकशी करून ठेकेदारवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच अशा घटना घडू नये यासाठी महापालिकेने कायम स्वरूपी उपाययोजना कराव्या, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.
 

Related Articles