पावसाने ओलांडला हजार मिलिमीटरचा टप्पा   

सातारा, (प्रतिनिधी) : कोयना धरणाअंतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. धरणाअंतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद ३१ हजार २५२ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.
 
धरणातून सोडलेले पाणी व कोयना नदी क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सध्या कोयना धरणात एकूण ४०.९४ टीएमसी उपलब्ध तर ३५.९४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.  संध्याकाळी  या चोवीस तासांत व एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे ९३ मिलिमीटर, नवजा येथे १०२ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच काळात धरणातील पाणीसाठ्यात २.७० टीएमसीने वाढ झाली आहे.

Related Articles