बरेली : प्राणी हे जीवन धन आहेत. त्यांना पशू संबोधणे अनुचित असल्याचे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या अकराव्या पदवी प्रदान सोहळ्यात मुर्मू काल बोलत होत्या. प्राण्यांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही, असे सांगताना त्या म्हणाल्या, प्राणी आणि मानवाचे नाते अनोखे आणि अनादी आहे. पूर्वी तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे प्राणी वाहतुकीचे एक साधन होते. शेतकर्यांसाठी ते वरदान आणि एक शक्तीचा स्त्रोत आहेत. त्यामुळे मी त्यांना पशू म्हणण्याऐवजी जीवन धन असे म्हणणे उचित मानते.
Fans
Followers