पं. रघुनाथ खंडाळकर यांना वैष्णव पुरस्कार जाहीर   

पुणे : विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जे. व्ही. इंगळे व त्यांच्या पत्नी मेघा इंगळे यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ यावर्षी अभिनव गंधर्व म्हणून ओळख असलेले  गायक पं. रघुनाथ खंडाळकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती इंगळे कुटुंबीयांनी दिली.
 
रोख २१ हजार रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ६ जुलै रोजी एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित करण्यात येणार्‍या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार खंडाळकर यांना प्रदान करण्यात येईल. या आधी पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, श्रीनिवास जोशी, पं. हेमंत पेंडसे, प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ. नंदकिशोर कपोते आणि गायक, संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

Related Articles