ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन   

मुंबई : अभिनेते, लेखक, संगीत दिग्दर्शक विवेक लागू यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. आज (शुक्रवार) सकाळी दहा वाजता अंधेरीतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
 
विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. विवेक लागू यांना संगीतातही रुची होती. मात्र, अपघातानेच ते अभिनयाकडे वळले. विजय मेहता यांच्या शिबिरात येण्याची त्यांना संधी मिळाली होती. मात्र त्या शिबिरात केवळ अभिनयाचेच धडे देणार होत्या. मुंबईत एक महिना राहता येणार यावे म्हणून ते या शिबिरात सहभागी झाले आणि येथे त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला. अभिनयातही त्यांनी पुरस्कार मिळवले. विवेक लागू यांनी १९७८ साली रीमा लागू यांच्याशी लग्न केले होते.  
 
विवेक लागू हे बँकेत काम करायचे. तिथे काम करता करताच ते इंडस्ट्रीतही काम करत होते. काही वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली. टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेली आणि गाजलेली मालिका ’चार दिवस सासूचे’ मध्ये त्यांनी काम केले. त्यांनी शेक्सपियरची दोन नाटकेही केली. ’अगली’, ’व्हॉट अबाऊट सावरकर’, ’सर्व मंगल सावधान’ या सिनेमांमध्ये ते होते. रंगभूमीवर काम करतानाच त्यांची ओळख झाली होती. पहिल्या नजरेतच दोघे  एकमेकांच्या प्रेमात पडले होते. १९८८ साली त्यांना मुलगी झाली.
 

Related Articles