जगन्नाथ यात्रा गुंडीच्या मंदिरात   

जगन्नाथ पुरी : जगन्नाथ यात्रेचा शनिवारी दुसरा दिवस होता. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ काल गुंडीचा मंदिरात पोहोचले. नऊ दिवसांच्या यात्रेला शुक्रवारपासून दिमाखात प्रारंभ झाला होता. गुंडीचा मंदिर तिन्ही भावडांच्या मावशीचे घर मानले जाते. त्यामुळे दरवर्षी १२ व्या शतकातील जगन्नाथ मंदिर ते गुंडीचा मंदिर अशी सुमारे अडीच किलोमीटर यात्रा काढली जाते. नऊ दिवस मंदिरात देव राहणार असून ते ५ जुलै रोजी जगन्नाथ मंदिराकडे परत येतील. या परतीच्या यात्रेला बहुदा यात्रा असे संबोधले जाते. 
 
दरम्यान, जय जगन्नाथ आणि हरी बोलच्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सवाला शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला होता. रात्री ती गुंडीचा मंदिरात पोहोचणार होती. परंतु ग्रँड रस्त्यावर भगवान बलभद्र यांचा तालध्वज रथ एका वळणावर अडकला होता. त्यामुळे यात्रेचा पुढचा प्रवास थांबविण्यात आला. परंपरेप्रमाणे बलभद्र यांचा तालध्वज अग्रभागी असतो. त्या पाठोपाठ देवी सुभद्रेचा दरपदलन आणि भगवान जगन्नाथ यांचा नंदीघोष रथ असतो. बलभद्र यांचा रथ अडकल्यामुळे यात्रा रात्रभर थांबली होती. रात्रभर कडेकोट सुरक्षेत तिन्ही रथ घटनास्थळी उभे होते. भाविकांनी रात्र जागून काढली. सकाळ होताचा अपूर्व उत्साहात पुन्हा यात्रा सुरू झाली. अखेर ती गुंडीचा मंदिरात पोहोचली.
 
 

Related Articles