रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार   

संकेतस्थळ, अ‍ॅपद्वारे तात्काळ तिकीट बुकींग

नवी दिल्ली : लांंब पल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या रेल्वेतील आसनांच्या आरक्षणाची यादी प्रवाशांना आठ तास अगोदर आणि ती रेल्वे सुटण्यापूर्वी उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने सोमवारी दिली. दरम्यान,  आयआरटीसी संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपचा वापरुन प्रमाणित प्रवासी तात्काळ तिकिटाचे बुकींंग करु शकतील. या सेवेला आज (मंगळवार) पासून सुरूवात होणार आहे. 
 
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आरक्षणाची यादी चार तास अगोदर जाहीर केली जात होती. आता त्यात बदल करुन ती रेल्वे सुटण्यापूर्वी आठ तास अगोदर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागात प्रवास करणार्‍यांची मोठी सोय होणार आहे. आसन पक्के झाल्याची खात्री पूर्वीपेक्षा चार तास अगोदर मिळणार आहे. पर्यायाने प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. 
 
दरम्यान, नवीन प्रवासी आरक्षण यंत्रणेत दीड लाख प्रवाशांच्या तिकिटांचे आरक्षण प्रती मिनिटाला होते. पूर्वी ते ३२ हजार तिकिटे प्रती मिनिट होते.एकंदरीत सुमारे पाचपट वाढ झाली आहे. सुधारीत यंत्रणा सुटसुटीत आणि विविध भाषेत माहिती देणारी आहे. तसेच आसनाचा क्रमांक, जागा आणि भाडे याचा तपशील मिळतो. तसेच दिव्यंग विद्यार्थी आणि पालकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. 

जुलै अखेर ओटीपी आधारीत सेवा 

आरआरटीसीच्या संकेतस्थळावर प्रमाणित वापरकर्ते तात्काळ तिकिट सेवेचा लाभ घेऊ शकतात. आज (मंगळवार) पासून मोबाइल अ‍ॅपवरुन प्रवासी तात्काळ तिकिटे खरेदी करु शकतील. जुलैच्या अखेरीपासून ओटीपी आधारीत तात्काळ तिकीट बुकींग सेवा सुरू होईल. प्रमाणिकरणासाठी आधार, सरकारी ओळखपत्रे वैध असून डिजी लॉकर
वापरणो देखील सेवेचा लाभ घेऊ शकतात. नागरिकांनी रेल्वेने अधिकाधिक प्रवास करावा, यासाठी आधुनिक यंत्रणेच्या वापरास रेल्वे मंत्रालयाने सुरूवात केल्याचे वैष्णव म्हणाले.
 

Related Articles