रोग निदानात अ‍ॅमेझॉनची उडी   

भाग्यश्री पटवर्धन 

अ‍ॅमेझॉनसारख्या झटपट सेवा आणि हवी ती वस्तू काही वेळात घरपोच करणार्‍या बड्या कंपन्या रोग निदान क्षेत्रात आल्याने महानगरांमध्ये रुग्णाला घरपोच निदान सेवा मिळणे हा मोठा दिलासा आहे. सध्या बहुतेक कंपन्या काही शुल्क आकारून अशी सेवा देत आहेत; मात्र मागणीच्या तुलनेत सेवेची व्याप्ती कमी असल्याने व्यवसाय वाढीस मोठा वाव आहे.
 
भारतात कोणत्या सेवेचा कोणत्या उद्योग क्षेत्रावर कसा परिणाम होईल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्यातही क्षेत्र सेवा हे असेल आणि रोग निदान चाचण्यांचा विषय असेल, तर संवेदनशील आणि राजकीय पडसाद उमटवणारा ठरू शकतो. याचे ताजे उदाहरण अ‍ॅमेझॉन या घराघरात तरुणाईच्या लाडक्या उद्योग समूहाने सुरु केलेली घरपोच रोग निदान चाचणी सुविधा. 
 
रोग निदानाला येणार खर्च सध्या तरी सामान्य व्यक्तीला परवडणारा नाही. चाचण्या, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, सरकारी आणि खासगी यांच्या सेवेचा दर्जा राज्या-राज्यात असलेला फरक असे अनेक मुद्दे त्यानिमित्ताने समोर येतात; मात्र या स्तंभात अ‍ॅमेझॉनच्या सेवेमुळे बाजारावर नोंदल्या गेलेल्या काही रोग निदान चाचणी सुविधा देणार्‍या कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात घसरण झालेली पाहायला मिळाली. देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी आणि अकार्यक्षम आहे हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचे महत्त्वाचे कारण गेली काही दशके अंदाजपत्रकात या क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद न होणे हे आहे. 
 
केवळ केंद्रातील नाही, तर राज्यांच्या पातळीवरही याबाबत अनास्था, निष्काळजीपणा आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाने कोट्यवधी लोकांना उपचार सेवा मिळत असली तरी ती पुरेशी नाही, याचाच अर्थ या क्षेत्रात व्यवसाय वाढीस प्रचंड वाव आहे. आजाराचे निदान करण्यास केल्या जाणार्‍या चाचण्या हा त्याच व्यवसायाचा भाग. आज या क्षेत्रात निवडक कंपन्या आहेत आणि त्यापैकी काहींनी भांडवल बाजारातून निधी उभारून विस्तार केला आहे. या क्षेत्रात संघटित आणि असंघटित, देशी आणि विदेशी, भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या महानगरात ज्यांची साखळी सेवा देणारी यंत्रणा असलेल्या असे अनेक फरक लक्षात घ्यावे लागतात. जिथे कमी तिथे आम्ही असे तत्त्व अ‍ॅमेझॉनसारख्या झटपट सेवा आणि हवी ती वस्तू काही वेळात घरपोच करणार्‍या बड्या कंपन्या या क्षेत्रात आल्याने आरोग्याच्या क्षेत्रात महानगरांमध्ये रुग्णाला घरपोच निदान सेवा मिळणे हा मोठा दिलासा आहे. 
 
सध्या बहुतेक कंपन्या काही शुल्क आकारून अशी सेवा देत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत सेवेची व्याप्ती कमी असल्याने व्यवसाय वाढीस मोठा वाव आहे. ही बाजारपेठ सध्या 15 अब्ज डॉलरची आहे आणि वर्षाला सरासरी 15 टक्के दराने वाढते आहे. ज्या नोंदणी झालेल्या कंपन्या आहेत.त्यातील काही अशा डॉ. लाल पॅथलॅब्स (52 wk high 3,653.95 52 -wk low 2,293.55) अ‍ॅबॉट डायग्नोस्टिक्स 52 wk high 141.23  52 -wk low 99.71 मेट्रोपोलिस हेल्थकेअर 52 wk high 2,318.30 52 -wk low 1,315.00 विजया डायग्नोस्टिक सेंटर 52 wk high1,275.00  52 -wk low 740.00 अपोलो डायग्नोस्टिक्स 52 wk high 7,545.35  52 -wk low 6,001.00. 
 
तंत्रज्ञानाचा फार मोठा भाग या सेवेत अंतर्भूत आहे. त्यामुळे वेगवान सेवा आणि अचूक निदान होऊ शकते. सरकारी आरोग्य सेवा कमी पडत असल्याने आणि हातात पैसे खेळणारे ग्राहक वाढत असल्याने अशा कंपन्यांचे भवितव्य देशात चांगले राहणार आहे. अ‍ॅमेझॉनमुळे स्पर्धा वाढणार असल्याने नोंदणी झालेल्या कंपन्यांना आपले व्यवसाय गणित आणि प्रारूप यात बदल करावा लागेल. विश्‍वास, सातत्य आणि ग्राहक सेवा गुणवत्ता या तीन गोष्टी कोण स्पर्धेत टिकते हे ठरवणार आहे. ज्या कंपन्या सध्या नोंदलेल्या आहेत त्यांचा गेल्या चार तिमाहीत नफा किती, विस्तार कसा होतो आहे, सेवेचा दर्जा कसा आहे याचा विचार करून दीर्घकाळासाठी या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल असे विविध ब्रोकरेज कंपन्यांचे अंदाज आहेत.
 
नेस्ले-किटकॅट इतकी गोड बातमी
 
• नेस्ले म्हटले की, आकर्षक वेष्टनातील किटकॅट चॉकलेट समोर येते. या चॉकलेट नाममुद्रेने लोकप्रिय झालेल्या या कंपनीने गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांना गोड बक्षीस देऊ केले आहे. ते आहे बोनस समभागाचे. घोषणा होणार हे कळल्यापासून हा शेअरवरची पातळी दाखवतो आहे. वेगाने खपणार्‍या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मितीत नेस्ले आघाडीची कंपनी आहे. संचालक मंडळाने अद्याप बक्षीस भागाची रेकॉर्ड तारीख निश्‍चित केलेली नाही. ती जाहीर होईल त्यावेळी शेअरला खरेदीचा आणखी पाठिंबा मिळेल. केवल बक्षीस भाग म्हणून नाही, तर दीर्घकाळासाठी हा शेअर भरघोस फायदा देणारा आहे. कमाल किमान भाव 52 wk high 2,778.00 52 wk low 2,110.00 असा आहे.

Related Articles