पालखी सोहळ्यानिमित्त आज वाहतुकीत बदल   

पुणे : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) ते २३ जूनपर्यंत दरम्यान शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहतूक शाखेने विविध उपाययोजना केल्या असून जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
 
मुख्य रस्ते बंद, पर्यायी मार्ग : पालखी सोहळ्याच्या मार्गावरील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. संत तुकाराम महाराजांची पालकी आकुर्डीहून पुण्याकडे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालकी आळंदीहून पुण्यात प्रवेश करणार आहे. या मार्गावर बोपोडी, खडकी, वाकडेवाडी, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, नानापेठ, बेलगाम चौक, पासोड्या विठोबा मंदिर आदी भागांतील वाहतूक पूर्णपणे किंवा काही काळासाठी बंद राहील. पालकी मार्गावर शहर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २० जून रोजी पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी नार्गावरील बोपोडी ते खडकी बाजार रस्ता, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील काही भाग वाहतुकीसाठी बंद राहतील. यासाठी भाऊ पाटील रस्ता, आर.टी.ओ.चौक, पर्णकुटी चौकयासारख्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. 
 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आगमनासाठी आळंदी, वडमुखवाडी, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट या मार्गावरील वाहतूक दुपारी तीन ते रात्री आठ वाजेदरम्यान बंद राहील. त्याऐवजी धानोरी, येरवडा कारागृह रस्ता, पर्णकुटी चौक आदी मार्ग सुरू असतील.

मध्यवर्ती भागातील बदल 

संचेती चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, जिजामाता चौक, बेलबाग चौक ते निवडुंग्या विठोबा मंदिर व पालकी विओबा मंदिरापर्यंत असलेल्या मार्गावर सकळी आठ ते रात्री बारा पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून सेनापती बापट रस्ता, नळ स्टॉप, शास्त्री रोड, रांका चौक, रामेश्वर चौक, फडके हौद चौक हे मार्ग वापरावेत. पालख्यांसोबत येणार्‍या वाहनांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. अनाश्यक प्रवास टाळावा, तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
 

Related Articles