आषाढी वारीत स्वच्छतागृहासाठी खास मोबाइल ’अ‍ॅप’   

पुणे : पालखी वारीमध्ये सहभागी होणार्‍या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे जिल्हा परिेदेच्या वतीने यावर्षी विशेष इ-टॉयलेट सेवा नावाच्या मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारेलला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जात आहे.
 
या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले असून, या अ‍ॅपच्या माध्यमांतून शौचालयाची उभारणी व स्थिती, स्वच्छतेची माहिती व नियमित वापर, शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज, रस्ता व साफसफाईची माहिती शौचालयाचा वापर किती झाला याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना नोंदवण्याची सुविधा, प्रत्येक शौचालयावर क्यू आर स्कॅनर लावण्यात आले आहेत. गुगल स्कॅनर वापरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास सबंधित  शौचालयाची माहिती मोबाइलवर तात्काळ मिळू शकते.
 
सदर अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, भाविकांनी या अ‍ॅपचा वापर करून सुविधा व स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकर्‍यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे.
 
वारी मर्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांची संख्या पुढीलप्रमाणे :
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज 
 
पालखी मार्ग : १८०० शौचालये
श्री संत तुकाराम महाराज 
पालखी मार्ग : १२०० शौचालये
श्री संत सोपान महाराज 
पालखी मार्ग : ३०० शौचालये
 

Related Articles