टी-२० क्रिकेटमधील ’पॉवर प्ले’संदर्भात आयसीसीचा नवा नियम   

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी २० क्रिकेटमधील ’पॉवर प्ले’संदर्भात नवा नियम लागू केला आहे. पाऊस किंवा अन्य कारणास्तव सामन्यात व्यत्यय आल्यानंतर षटके कपातीच्या निर्णयानंतर हा नियम सक्रीय होईल. थोडक्यात टी-२० सामन्यात व्यत्यय आल्यावर षटकांची संख्या कमी करण्यात आल्यावर या नव्या नियमानुसार पॉवर प्लेमध्ये किती षटके टाकायची ते ठरवले जाईल.सध्याच्या घडीला २० षटकांच्या खेळात ६ षटकांचा ’पॉवर प्ले’ असतो. जुलै २०२५ पासून लागू होणार्‍या ’पॉवर प्ले’संदर्भातील नव्या नियमानुसार, जर निर्धारित २० षटकांचा सामना काही कारणास्तवर  ८ षटकांचा खेळवण्यात आला तर या सामन्यासाठी २.२ षटकांचा पॉवर प्ले असेल. याचा अर्थ १४ चेंडू पर्यंत ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त २ क्षेत्ररक्षक असतील. ९ षटकांचा सामना असेल तर पॉवर प्ले २.४  आणि ५ षटकांच्या सामन्यात १.३ षटकांचा खेळ हा पॉवर प्लेच्या रुपात गणला जाईल. टी-२० सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान ५ षटकांचा खेळ होणं अपेक्षित असते. 
 
कमी झालेल्या षटकानुसार, कसा ठरवले जाईल ’पॉवर प्ले’च गणित ५  षटकांच्या खेळात -१.३ षटकांचा ’पॉवर प्ले’ ६  षटकांच्या खेळात -१.५ षटकांचा ’पॉवर प्ले’ ७  षटकांच्या खेळात -२.१ षटकांचा ’पॉवर प्ले’ ८  षटकांच्या खेळात -२.२ षटकांचा ’पॉवर प्ले’
 

Related Articles