शेअर बाजाराची उसळी   

मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सकारात्मक वातावरण दिसले. परदेशी गुंतवणुकीचा ओघ काल सुरू होता. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वाढल्याचे दिसून आले. आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे ब्लू चिप खरेदीकडे ओढा काल वाढला.आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांचे मूल्य वाढले, खनिज तेलाचे दर घसरले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढला आणि उलाढालही वाढल्याचे दिसून आले.  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३०३ ने वाढून तो ८४ हजारावर गेला. बाजार बंद होताना तो ८४ हजार ५९ वर होता. दिवसभरात एका क्षणी त्याने ३०३.४८ ने उसळी घेत तो ८४ हजार ९० पर्यंत पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ८८८.८० ने वाढून तो २५ हजार ६७३ वर बंद झाला. एशियन पेंट्स, अल्ट्रा टेक सिमेंट, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि सन फार्माचे यांच्या समभागांचे मूल्य वाढले. या उलट ट्रेंट, इटर्नल, अ‍ॅक्सिस बँक आणि टायटन कंपन्याच्या समभागांचे मूल्य घसरले. दरम्यान, परदेशी गुंतवणूकदार संस्थानी गुरुवारी १२ हजार ५९५ कोटींची गुंतवणूक केली. इस्रायल आणि इराण यांनी युद्धविराम घोषित केला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आले. तणाव निवळेल की नाही, अशा विवंचनेत गुंतवणूकदार होते. तसेच गुंतवणुकीबाबत सावधगिरीने पावले टाकत होते. 
 

Related Articles