भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल   

माओ निंग यांचे मात 

बीजिंग : भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा असून, तो सोडवण्यासाठी वेळ लागेल. मात्र, त्याच वेळी सीमांच्या सीमांकनावर चर्चा करण्याची आणि परिस्थिती शांततापूर्ण राखण्याची आमची तयारी आहे, असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी व्यक्त केले आहे.  
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २६ जून रोजी किंगदाओ येथे चिनी समकक्ष डोंग जून यांच्याशी झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. भारत आणि चीनने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि सीमांकनाची विद्यमान व्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचलून एका स्थापित चौकटीत जटिल मुद्दे सोडवावेत.
 
सिंग आणि डोंग यांनी किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्यावेळी द्विपक्षीय चर्चा केली. त्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) शांतता आणि स्थिरता राखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. सिंग यांच्या वक्तव्यावर चीनच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यामाओ निंग म्हणाल्या, मी तुम्हाला सांगू शकतेे की चीन आणि भारताने सीमा संबंधित मुद्द्यांवर एक विशेष प्रतिनिधी यंत्रणा स्थापन केली आहे. चीन-भारत सीमा समस्या सोडवण्यासाठी राजकीय मापदंड आणि मार्गदर्शक तत्त्वांवर सहमती दर्शविली आहे.

संवादासाठी यंत्रणा

माओ निंग म्हणाल्या, दोन्ही बाजूंमध्ये विविध पातळ्यांवर राजनैतिक आणि लष्करी संवाद यंत्रणा आहेत. ’सीमा सीमांकन आणि सीमा व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांवर भारताशी संवाद सुरू ठेवण्यास, सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखण्यास, सीमापार देवाण-घेवाण सहकार्याला प्रोत्साहन देण्यास चीन तयार आहे.’
 

Related Articles