गणेशखिंड रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे अपघातांचा धोका   

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरून सेनापती बापट रस्त्याकडे वळणार्‍या चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन चेंबर उघडे आहे. यातून सतत सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. हे पाणी उताराच्या दिशेने जवाहर नगर ते रेंज हिल कॉर्नरपर्यंत साचत असल्याने येथे अपघांताचा धोका आहे. या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघाताला सामोरे जात असून, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत. 
 
या पार्श्वभूमीवर मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना चेंबर तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
या वेळी उपविभागाध्यक्ष निलेश जुनवणे, संजय तोडमल, दत्ता रणदिवे, अँथोनी आढाव, अँड. चैतन्य दीक्षित, मिलन भोरडे, मयूर बोलाडे, शंकर पवार, सूरज कुसाळकर, शाम माने, किशोर इंगवले आणि अनेक मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles